तो…..
कुणास होते ठाऊक तो देव आहे
देवानेच निर्माण केलेली एक उत्तम कलाकृती आहे
लहानपणी तो नुसताच विचार करी
मैदानात दादाला पाहून टाळ्या वाजवी
घरातल शेंडेफळ म्हणून अर्ध्या चड्डीत धोपाटन हाती धरी
कुरळ्या केसांची झुलपं, गोरापान गोबरे गाल
खरच देवाचा अवतार
हळू हळू तो मोठा झाला
एकदा दादानेच गुरूंना सांगितले गपचूप
हातात दिल “अस्त्र” त्याच पहिल्यांदा
“समोरचा मारा टोलाव पाहू” मिळाली आज्ञा
देवच तो शेवटी गाली हसला अन उगारला अस्त्र तरं गुरूच अवाक
रोज रोज त्याच अस्त्र तो धार लावून तेज करी
समोरच्याला पार उखडून दम घेई
लाडका पुत्र घरी येई तेव्हा आई काकी पाय चेपी
गोर्या चंद्राला तीट लावी ,त्या रात्री बाबांनीच दटावल ” राजे झोपा आता”
त्या दिवशी मिळाला त्याला त्याचा सूर
सारेच झाले अवाक पाहून त्याचा नूर
दिग्गज मंडळीना पडती स्वप्ने
त्याच्या लढतीची अन एका उत्तम लढवैया गवसल्याची
दमदार लढत अन द्विशतक
त्यावर्षी झाला चमत्कार
लढाईच्या मैदानात मिळाला प्रवेश प्रथम
“सीमेवरच राहा बर का” मिळाला वरिष्ठ योध्याकडून दम
त्यावेळी पहिले स्वप्न पुढच्या अश्वमेधात मीच असेल
अन अवाक करेन सार्यांना माझ्या कलेने
भले भले योद्धे ह्याला जाती शरण
काही करती डिवचण्याचा क्षुद्र पण
नाही डगमगली ह्या योग्याची साधना
मनापासून तो त्याची “खेळी” खेळी
मोठे ह्याच्या कडून शिकत
अन लहानांचा तो आदर्श
नव्या दमाच्या चमूचा हाच होता वाटाड्या
सारे भक्तच ते त्याचे त्याला साथ करती
स्वप्नच होते त्यांचे रोखावा अश्वमेध ह्या आपल्या अराध्यासाठी
आज तो क्षण आला रोखला अश्वमेध नव्या दमाच्या योद्ध्यांनी
अन वाहिला ह्या ईश्वरचरणी
देवच तो पाहुनिया भक्तांचे प्रेम फुटले डोळ्यांतले पाझर
अहो तोच तो आपला सचिन तेंडूलकर…….



