खरच खूप आठवण येतेय त्याची, तीन दिवस कसे गेले कळलच नाही. तब्बल दोन वर्ष्यानी झालेली भेट.पण ह्यावेळेस मात्र चटकन पटकन उरकल सगळ. कोण ठाऊक आहे. जाउद्या हसाल तुम्ही सारे. अहो तोच तो “समुद्र”,”सागर”,”रत्नाकर” काहीही म्हणा. पण तो माझा मित्र, सखा. खूप खूप बोलले मी त्याच्याशी. पहिल्यादिवशी तर आमच विमान जमिनीवर “Land “करता क्षणीच त्याची साद कानात गुंजायला लागली होती. खरेतर विमानातून त्याच अथांगतेच दर्शन होतच होत. कोल्व्याला पोचेपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तो आपलं ” किती दिवसांनी आलीस” च्या तालावर लाटेमागून लाट माझ्यापर्यंत पोचत होता. आणि एका जोरदार लाटेने मला चांगलीच गटांगळ्या खायला लावल्या. ते त्याच नेहमीचच आहे. मलाहि त्याशिवाय बर वाटत नाही. चिंब चिंब होऊन जाताना माझ बालपण, हनिमुनचे दिवस, बाळाची चाहूल सगळ सगळ आठवत होत. ज्या दिवशी टेस्ट +व आल्या त्याच दिवशी आम्ही परत ह्याच्याशी आनंद वाटून घ्यायला आलो होतो. सांगते काय तो आमच्या सुख दुखाचा साथीदार आहे. मुंबईत जनतेने ह्याला काहीसा विद्रूप केला आहे पण तरीही आम्हा दोघांसाठी तोच तो “मित्र”.
पण ह्यावेळेस तो थोडासा नाराज वाटला. बदलत्या निसर्गाने त्याला चांगलाच दमवून टाकला होता. काय चाललं त्याच्या अथांग मनात तोच जाणे. तो सांगत नाही, कुणाला कळूही देत नाही पण धरती माता आणि निसर्ग ह्याचं बिनसलं कि सगळा सगळा राग ह्याच्यावर, ह्याच्या लेकरांवर. लोक सुद्धा ह्या सुधाकराला समजूनच घेत नाही. शिकावं रे ह्याच्या कडून इतकी दुख पचवून आनंदाने परत लाटांना तुमच्यापर्यंत पोचवतो तो. अगाध संपप्ती देतो तो. पण ह्याच्या लेकरांना आपण स्वचंदपणे जगूच देत नाही. डॉल्फिन मासे आणि त्यांच्या मागे लागलेले डॉल्फिन चेसेर. करा ना मजा , अडवतोय कोण ,पहाना त्यांना मुक्त विहार करताना. पण सकाळी लवकर या किनार्यावर दिसतील तुम्हाला ते अगदी जवळच. Paracelling करा त्याची खरी धुंद करणारी शुद्ध हवा फुफुसात घ्या भरून, स्कूटर बोट ने लाटावर स्वर व्हा. पण तेच डीसेल किवा पेट्रोल त्याच्या पाण्यांत मिसळू देऊ नका. सुंदर आहे तो फार, त्याचा स्पर्श, चवच मुळी नशा. का हवी तेव्हा दारू पब्लिकला. काय काय पाहत असेल नाही तो रोज अगदी रोज. त्यामुळेच हि आपली धरती आकाशगंगेत निळीशार दिसते. हो ना शिकलो ना आपण इयत्ता दुसरीत. फार फार विषन्न वाटला तो, आपला राग नेहमीप्रमाणे गिळून होता. पण त्याचा एक एक स्पर्श सांगत होता. काही तरी आत बिनसलंय खरी. माझा पाय निघेचना तिथून. अगदी जेट मधून लाईटली आलो तरी तो साथ करतच होता. हेमुला म्हंटला, मी जेव्हा ह्या जगाचा निरोप घेईन तेवा एक “चिमुट माझी” इथे इथे ह्या माझ्या मित्राच्या अंतरंगात जरूर सोड. इथेच गोव्यात, माझ्या लाडक्या कोल्व्याच्या समुद्रात.
त्याने माझ्या साठी दिलेल्या काही पोझेस….








मस्त शब्दरचना ,लेख आवडला
धन्यवाद