हि पोस्त लिहून मी देखील खादाडीच्या टोळीत यायचा पर्यंत करणार आहे. मला वेगवेगळ्या डिशेश खाण आणि खिलवणे फार आवडत. हि पोस्त लिहिण्यास कारण कि. समस्त माझ्या सारख्या मंडळीसाठी खुश खबर आहे. आता पर्यंत कार्टून नेटवर्क, एम टीवी, फिल्मी, वगैरे वगैरे टीवी dedicated channels आले. पण ज्यांना खाणे आणि खिलवणे आवडते त्यांच्या साठी अगदी २४ तास खवव्येगिरीचे एक channel आता सुरु झाले आहे. त्याच नाव आहे “फूड फूड” (ह्या साठी मात्र केबल वाल्याचे मनापासून आभार. नाहीतर शहाणा कधीहि चांगले चांगले channels गायब करत असतो) २४तास असल्या कारणाने साधारणपने दुपारी लागणाऱ्या वेगवेगळ्या कुकरी शोज ची किवा त्यांच्या रीपिटची वाट पहावी लागणार नाही. आणि हो ह्या वाहिनीचे सर्वे सर्वा आहेत दस्तुरखुद्द “संजीव कपूर” व्वा, सुटल ना पाणी तोंडाला.
मला लग्नापूर्वी चहा आणि कणिक भिजवणे ह्या पलीकडे काही येत नसे. पण संजीव काकांच्या पुस्तकांनी आणि “हमखास पाकसिद्धी” ह्या हेमूच्या अनमोल अशा लग्नाच्या गिफ्ट्सनि मला पाक सिद्धी जमते आहे “टच वूड”. तर ह्या संजीव काकांचा मुक्त विहार आहे ह्या वाहिनीवर “संजीवस किचन” ह्या कार्यक्रमात. आताही हि पोस्त लिहिताना पार्श्वभूमीवर संजीव काका एक जॅमची रेसिपी सांगत आहेत.
केवळ हेच नाही कितीतरी वेज ,नॉनवेज,आंतराष्ट्रीय, देशांतर्गत प्रसिद्ध रेसिपीस, तेसेच झटपट पदार्थ, काही स्पर्धा वगैरे सगळ सगळ आहे. गेले दोन दिवस भरपूर रेसिपीस पहिल्या आहेत. संजीव कपूर ह्यांच्या रेचीपीस बरोबर अनेक टिप्स, त्यांनी वापरलेल्या विविध उपकरणे, स्वैपाकाची नवनवीन भांडी, इ. नेहमीच उपयुक्त ठरतात. एवढेच नाही तर “चाय नास्ता” ह्या कार्यक्रमात चहा बरोबर काही उत्तम अशा नास्त्याचे प्रकार दाखवले जातात. नाहीतरी दर रविवारी हमखास पडणारा प्रश्न असतो हा कि दुपारच्या जेवणापर्यंत घरच्या मंडळीच्या पोटात काहीतरी असण गरजेच नाहीतर आमच्या घरासारखी प्लेट आणि “चम्मू” (चमचा हो, काय आहे हि दोघ बाप आणि लेक महा कठीण) “ठणठ्नात” करतील “कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो ” चा धोशा आहेसच काय बरोबर ना.
चायनीज पदार्थ हे मात्र विशेष दाखवले जातात इथे, पण त्याच बरोबर “टर्बन तडका” मध्ये टिपिकल पंजाबी तर “सदर्न फ्लेवर्स” मध्ये दक्षिणात्य पारंपारिक पदार्थ दाखवले जातात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या प्रांतातल्या खास पदार्थ जे खास ठिकाणीच मिळतात उदा. आपल्या मुंबईतील “खाऊ गल्ली”, कॅनोनची पाव भाजी (फार प्रसिद्ध आहे म्हणे अजून काही खायचा योग आला नाही), आमच्या ठाण्यातला “राजमाता वडा”, इ. अशी ठिकाण. अर्थात संपूर्ण भारतात कितीतरी ठिकाण असतील अशी अश्या जागांची माहिती मिळते “खाता रहे मेरा दिल” मध्ये. एक इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे “बॉलीवूड डब्बा पार्टी” ह्यात सीने तारे तारकां ह्याच्या खास “घर के खाने का टिफिन” ह्या विषयी देल्नाझ पौल सर्व सिक्रेट शेअर करते.
खूप खूप आहे ह्या वाहिनीवर. तुमच्याकडे अजूनही दिसत नसेल तर केबलवाल्या बिलाच पेमेंट करते वेळेस आधी Tune in करून घ्या. मस्त एन्जोय करा. आणि नवनवीन पाककृतींनी घरच्या मंडळीना खुश करा. शेवटी साऱ्या सुखांचा मार्ग हा पोटातून जात असतो हे लक्षात ठेवा. तेव्हा “हैप्पी कुकिंग” 



