प्रिय आबांस

प्रिय आबांस,

आबा आज पुन्हा एक नवा दिवस सुरु झालाय पण तुम्ही नाही. आज सकाळी शाळेसाठी निघाले गार गार हवा लागत होती पण त्या हवेत एक वेगळेच एकाकी पण होते. दिवालीच्या पणत्या हि दारात तस्श्याच पडून आहेत. दोन दिवसापासून. वात आहे, तेलही आहे पण उर्ज्या नाही. आबा आजी भेटेल बघा माझी तिथे. ज्या म्हातारीच्या हातात “हरिपाठाचे”पुस्तक असेल न तीच ती. तिच्याच सानिध्यात राहून “आबा” हे कोण ते कळंल होत. काळ होता अलीकडचाच म्हणजे साधारण ९३-९४ चा असेल दंगली झाल्या होत्या बघा. तेव्हा आजी म्हणायची ठाण्यात भीती नाही “दिघे” आहेत इथ काही होणार नाही. आणि त्याचा “बाप” बसलाय तिथ दादरला काही होणार बघ. पांडुरंग आहे त्याच्या पाठीशी. मी विचारला “कोण ग आजी हे”? आजी च उत्तर कस आला माहिती आहे अगदी कडक आवाज “बाळासाहेब ठाकरे” आबा म्हणायचं ह्यांना?” अशी ती पहिली ओळख.

आबा तुम्ही निर्माण केली हि जनता किती केवढी आहे ह्याच काहीही परिमाण नाही हो. माझ पाहिलं वहिल मतदान मला आजही ठाऊक आहे. ठरवलंच होत कि जेव्हा केव्हा आपला चान्स येईल तेव्हा धनुष्यच. कारण नकळतच थोडे फार संस्कार होत गेले. गमत सांगू पूर्वी दिघे साहेब म्हणजे ठाण्यातला वाघ अस समीकरण असे. त्याचं ऑफिस भर ठाण्यात बाजापेथेट आहे. आजही त्याच्या ऑफिस जवळून शॉट कट मारताना आत डोकावतो तर तिथे असलेला एक फोटो दिसतो आबा आणि दिघे काका. ह्या ऑफिसात कोणीही कधीही काहीही काम घेऊन जावे मग झेरोक्स प्रती अटेस्टेड करणे असो कि कॉलेज प्रवेश शिवसेनेचं ऑफिस म्हणजे १००% काम होणार.

तुम्हाला एक गमत सांगते, दिघेच्या ऑफिस मध्ये बायकोला त्रास देणाऱ्या नवर्याची चांगली धुलाई पण होत असे. बाई रडत रडत आली कि लोक विचारते होत. दिघे काका म्हणायचे जा रे अन उचलुन इकडे त्याला “भडव्याला हुंडा हवाय काय”. पोर त्या माणसाला सांगत ” साहेबांनी बोलावलंय” असा निरोप आला कि तो माणूस तिथेच सटपटायचा. आणि ऑफिसात आला कि काही बोलायच्या आत त्याच कानफात फुटायचं. मग पुढच सगळे शांत सासू, सासरा,दीर सगळे गप गार. अहो माझ्या शेजारच्या शुभा आत्याची गोष्ट हि. तिथले आणि सेना भवनातल पब्लिक आया बहिणी आल्या कि मना खाली करून अदबीन बोलायचे. पण त्यःच्या कडे कोणी वाकडी नजर टाकतेय अस दिसल कि आधी तोडणार त्याला.

सेनेच अस रूप तुमच्या मुळेच दिसल. आणि नकळत्या वयात एक वेगळीच प्रेरणा मिळत गेली. राजकारण आणि आपला काहीही संबंध नाही आबा पण तुमचा विषय निघाला कि ऐकत रहाव, वाचत रहाव, आणि पाहत रहाव. मराठी माणूस आज आहे आबा केवळ तुमच्यामुळे आज माझ्या सारखे अनेक मराठी तरुण नोकर्या सोडून स्वतःच व्यवसाय करायला धजावत आहेत तुमच्यामुळे. करड्या आवाजात तुम्ही जेव्हा दसर्याला बोलत तेव्हा तल्लीन व्हायचो सगळे.

आबा आज तुम्ही नाहीत. आज त्या शिवतीर्थावरील मातीत मिसळून गेलात. आज हेमू गेलाय तिथ. चुकला क्रिकेटर सापडणार कुठे तिथच ना पण आज तिथून फोन करून म्हणाला “आशु विभूती झाली आज पार्काची माती आज पहिल्यांदा पूल ठेवताना पाया पडलो त्या मातीच्या”

आबा खरच गेलात पण मागे ठेवलीत ती आठवण. तुमच्या भाषणाच्या सीडी शोधत फिरतील लोक आता. क्यारीकेचर्सची पुस्तक होतील. कसाब आणि पुढची कित्येक वर्ष पाहुणचार झोडेल, नालायक लोक म्हणतील हि “क्या लेके गया ?” म्हणू देत. आबा पण जगातला प्रत्येक मराठी माणूस ज्या प्रमाणे लालबाग, सिद्धिविनायक,शिवाजी महाराज, आणि स्वत:ची आई ह्यांपुढे नतमस्तक होईल त्याचप्रमाणे तुमच्या समोरही.

आबा…….लवकरच भेटू…..पण असाच आशीर्वाद राहुन्द्यात आमच्या पाठीशी आणि आमच्या लेकरांच्या पाठी

साष्टांग दंडवत

About mazejag

You say
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to प्रिय आबांस

  1. ९४ च्या दंग्यात तर जर शिवसेना नसती तर? हा विचारच अंगावर काटा आणतो. श्रद्धांजली.

    • mazejag says:

      सुदैवाने ठाण्यात कहीही झाले नव्हते. राबोडी सारखा एरिया पण शांत होता.

  2. दंगलीच्या वेळी मी मुंबईतील आमच्या बटाट्याच्या चाळीत होतो. आमच्या बाहेर सर्व मुसलमान वस्ती असूनही स्थानिक मुसलमानांकडून कोणतीही आगळीक घडली नाही. ह्याचे कारण लेखात उल्लेख आहे तसा शिवसैनिक आमच्यासाठी तेथे हजर होता. पण जेव्हा वांद्र्याच्या बेहेराम पाड्यांतून लांडे चाळ जाळायला आले. तेव्हा चाळीतील पोर शिव सैनिक असे मिळून हे आक्रमण आम्ही परतवून लावले. शाळकरी वयातील तो रोमांचित अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, तेव्हा अवघा भगवा रंग एक झाला होता. साहेब होते म्हणून मुंबईत मराठी माणूस टिकून होता- आता मुंबई मध्ये मराठी माणुस पोरका झाला.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s